रूट कॅनल (आरसी) उपचार
रूट कॅनल उपचार म्हणजे काय?
आपल्या तोंडातील दात एकमेकांना बांधलेले नसतात.
प्रत्येक दाताला (दाढेला) एक किंवा दोन किंवा तीन मुळे (रूट) असतात. दात तोंडात पांढरा दिसतो. हा पांढरा भाग दगडासारखा कठीण असतो त्याला 'एनॅमल' असे म्हणतात. एनॅमलच्या आत विटेसारखा थोडा नरम परंतु, कडक पिवळसर भाग असतो त्याला डेंटीन असे म्हणतात.
रूट कॅनाल
डेंटीनच्या आत एक पोकळ जागा असते. त्यात नस (मांसल भाग) असते. ही पोकळ जागा हिरडीच्या वरच्या भागातील दातात (क्राऊनमध्ये) सुरू होऊन, थेट दाताच्या मुळांतून पलिकडे पोहचलेली असते. या पोकळ जागेत दाताला संवेदना देणारे मज्जातंतू आणि रक्तवाहिन्या (केसाइतक्या बारीक) असतात. जेव्हा कोणत्याही कारणाने (कीड लागून किंवा तुटून) पोकळ जागेतील मांसल भागाला (नसला) इजा झाली, तर त्यात पू होऊ शकतो. अशा खराब झालेल्या नसा काढून त्या जागा स्वच्छ करून, विशिष्ट प्रकारचे पदार्थ (गतपर्चा )सिमेंटने भरून ती जागा बंद करतात. या सर्व क्रियेला रूट कॅनल उपचार असे म्हणतात.
रूट कॅनल उपचार का करावा लागतो?
१) दाताला मार लागल्यास अथवा तो तुटल्यास (यामध्ये दाढेच्या संवेदनशील भागात इजा पोहचल्यामुळे दात ठणकतो).
२) दाताची कीड खोल जाऊन ती मज्जातंतूपर्यंत पोहोचल्याने दात ठणकतो.
३) जारत झीज झाल्याने ठणका बसतो. पुढील कारणांमुळे जेव्हा दाताच्या मज्जातंतूपर्यंत धक्का लागतो, तेव्हा दात ठणकू लागतो, त्याच्या मुळाशी सूज येऊ शकते किंवा मार लागलेला दात कधीकधी काळा पडू शकतो. अशावेळी दात काढण्याऐवजी दात वाचविण्यासाठी रूट कॅनल ट्रिटमेंट करणे आवश्यक असते.
रूट कॅनल ट्रिटमेंट कशी केली जाते?
वरील ट्रिटमेंट सुरु करण्यापूर्वी काही वेळेस संबंधित दाताचा मुळापर्यतचा फोटो (X-ray) काढून तो दात, त्याच्या भोवतालचा भागाची, मुळाची तपासणी करतात. असा दात रूट कॅनल ट्रिटमेंटला योग्य असल्याची खात्री करुन घेतली जाते. ट्रिटमेंटची सुरुवात करतांना काही वेळेस वेदना होऊ नयेत, दुखू नये यासाठी दाताच्या भोवतालचा भाग बधीर करण्याचे इंजेक्शन दिले जाते.
त्यानंतर दात कोरण्याच्या विशिष्ट उपकरणांनी दातातील खराब मज्जातंतू, रक्तवाहिन्या, दाताचा किडलेला भाग या सर्व गोष्टी साफ केल्या जातात. दाताच्या मुळांच्या टोकापर्यतचा भाग या क्रियेत साफ होते. यानंतर हा सर्व भाग निर्जंतुक करण्यात येतो. यासाठी काही औषधांचा वापर करुन साफ केलेल्या भागात ड्रेसिंग करतात.
दाताचा दुखणे पूर्णपणे थांबेपर्यंत किंवा सूज असल्यास ती पूर्णपणे ओसरेपर्यत जरुरीनुसार तीन-चार किंवा पाच-सहा वेळा किंवा एका व्हिजीटमध्ये ही क्रिया करावी लागते. दाताचा आणि मुळाचा आतला पोकळ भाग (रुट कॅनल) ज्यावेळी पूर्णपणे निर्जंतूक होतो, दुर्गंध सूज इ. थांबते तेव्हा विशिष्ट पदार्थांनी (उदा. गटा पर्चा भरन, बाहेरून सिमेंट / चांदी इ. पदार्थांनी भरतात.
या ट्रिटमेंटला किती वेळ लागतो?
वरीलप्रमाणे वर्णन केलेली ट्रिटमेंट साधारणपणे2-4 तासात होऊ शकते
एक किंवा दोन फेऱ्यान मध्ये होऊ शकते.
अधिक गुंता गुंत असल्यास जास्त वेळ पण लागू शकतो.
दाताच्या कामात काही वेळा फारशी गुंतागुंत नसल्यास केवळ एका सत्रातसुध्दा ही ट्रिटमेंट होऊ शकते.
दाताच्या मज्जातंतूंची इजा अन्य कोणत्या उपायांनी बरी होऊ शकते?
क्वचित मज्जातंतूवर काही विशिष्ट औषधे लावून ठराविक कालावधीनंतर दातात चांदी भरुन, दात पूर्ववत होऊ शकतो. परंतु इजा जास्त प्रमाणात असल्यास, मज्जातंतू नुसती औषधे लावून बरी होत नाही. काहीवेळा रूट कॅनल ट्रिटमेंटचाही उपयोग होत नाही. अशा परिस्थितीत दात काढून टाकणे हाच पर्याय उरतो किंवा औषधे वारंवार घ्यावी लागतात.
या ट्रिटमेंटमुळे दात डेड होते हे खरे आहे काय? (Dead - मृत)
या ट्रिटमेंटमुळे दात 'डेड' होत नसून त्यातील थंड, गरम इ. सवेदना नाहीशा होतात. ही सर्व प्रक्रिया दाताच्या मुळामधील पोकळ नलिकेत होत असल्याने तिचा शरीरातील इतर मज्जातंतूवर परीणाम होत नाही. दात शरीरातील हाडाशी जुळलेला असतो.
या ट्रिटमेंटनंतर काय करावे लागते?
ही ट्रिटमेंट झाल्यावर आवश्यकतेनुसार दातातील खड्डा विशिष्ट कठीण कंपोझीट सिमेंटने अथवा चांदीने बुजविणे / दाताला टोपी (लॅप) उमविणे, ओवरले हया पैकी आवश्यक काम करणे.दात नैसर्गिक दिसण्यासाठी दाताच्या रंगाचे आवरण असलेली कॅप बसविता येते. नाहीतर, जस भगलेला दात अंदाजे दोन वर्षानी ठिसुळ होऊन तुटू शकतो.
कॅप
कॅप करताना आपण दाताला सगळया बाजूने कट करतो त्यामुळे नीसर्गिक दाताचे जतन कमी होते
कॅप केल्यानंतर जर योग्य प्रकारे निगा नाही राखली गेली तर कीड उधबवण्याचे प्रमाण जास्त असते
आतील दाटला आवश्यक तेवढी उंची नसेल, तर कॅप सारखी निघू शकते
ओवर ले
Cap च्या तुलनेत ओवरले साठी कमीत कमी दात कट करावा लागतो. त्यामुळे दाताची मजबुती जास्त टिकून राहते.
कॅप पेक्षा अधिक घट्ट आणि सुरक्षित फिटींग असते.
त्यामुळे अधिक निसर्गिक संरचना कायम राहते
या ट्रिटमेंटनंतर दात कायमचा टिकतो का?
बर्याच वेळा विना प्रयास ही ट्रीटमेंट पूर्णपणे यशस्वी होते. मात्र असे असूनही क्वचित शरीराची प्रतिक्रीया अनुकूल नसली अथवा अन्य काही गुंतागुंतींमुळे अपयशाची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी भविष्यात री रुटकानाल ट्रीटमेन्ट किंवा दात काढणे हे पर्याय असतात. बहुतांशी या प्रकारच्या ट्रिटमेट नंतर दात अनेक वर्षे आपणास काम देतो. कॅपच्या शेजारी ब्रशने व फलॉसने दात स्वच्छ ठेवावे.
रूट कॅनल ट्रिटमेंट नंतरही दात किडू किंवा दुखू शकतो का?
प्रत्येक ट्रिटमेंटच्या वेळी दातातील कीड काढून टाकली जात असली तरी इतर कोणत्याही दाताप्रमाणे याही दातांना पुन्हा कीड लागू शकते. यासाठी अशा दाताची तपासणी दरवर्षी दाताच्या डॉक्टराकडून करुन घेणे जास्त चांगले. ही ट्रिटमेंट फक्त दाताच्या मुळाच्या मज्जातंतूपुरताच मर्यादित आहे. मुळाभोवतालचे मज्जातंतू किंवा दाताच्या अवती भोवती असलेल्या कीडीमुळे रूट कॅनल केलेला दात दुखणे शक्य असते. रूट कॅनल केलेल्या दातांच्या मुळाच्या पलीकडे हाडात पोकळी cyst असल्यास काहीवेळा ती ऑपरेशन करुन काढावी लागते. जरुरीनुसार वेळोवेळी आपल्या दातांच्या डॉक्टरांकडून तपासणी व त्यांचा सल्ला घेणे हा त्यावरचा सोपा उपाय आहे. किडलेला किंवा दुखणारा दात वाचविण्याच्या इतर ट्रिटमेंटपेक्षा ही थोडी वेगळया प्रकारची असल्यामुळे त्या संदर्भातील सर्व माहिती शंका. खर्चाचा अंदाज इत्यादी गोष्टी ट्रिटमेंट घेण्याआधीच डॉक्टरांना विचारून घेणे योग्य असते.